पुणे – मैदानांची जशी मशागत केली जाते, त्याचप्रमाणे तालमीतील मातीचीही मशागत होणे गरजेचे असते. अशा मशागतीमुळे शेतातील मातीतून जसे बीजरुपी अंकूर फुटतात, तसेच तालमीतील लाल मातीतून नामवंत मल्ल तयार होतात.
त्यामुळे तालमीतील मातीची मशागत करण्याकरीता सदाशिव पेठेतील कुंजीर तालमीला मारणे परिवारातर्फे ताक, हळद, लिंब, तेल, मीठ असा लाल मातीचा खुराक देण्यात आला.
कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या जयंतीनिमित्त मारणे परिवारातर्फे तालमीमध्ये कुस्तीपटूंकडे हा लाल मातीचा खुराक सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ. शैलेश गुजर, पै. श्रीकृष्णदादा बराटे, विशाल गायकवाड, रामदास मारणे, शाम मारणे यांसह पै. अमर गायकवाड, हेमंत माझिरे, श्रीकांत चोरगे, ऋतिक पायगुडे, केदार शेळके, प्रथमेश वीर, युवराज खोपडे, प्रवीण दहिभाते, जय खोपडे आदी उपस्थित होते.
सुमारे 100 लीटर ताक, 5 तेलाचे डबे, 50 किलो हळद, 2 गोणी लिंब, 25 किलो मीठ असा मातीचा खुराक यावेळी कुस्तीपटूंकडे देण्यात आला.