“स्टार प्लस’ या मनोरंजन वाहिनीवर सुरू असलेल्या एकता कपूरच्या “कसोटी जिंदगी की -2′ या मालिकेला अद्याप म्हणावी तशी लोकप्रियता लाभलेली नाही. 2001 ते 2008 या सात वर्षांच्या काळात या मालिकेचा पहिला भाग जेव्हा सुरू होता तेव्हा तो सुपरहिट झाला होता.
त्यामुळेच तो सात वर्षे चालला. पण त्यानंतर दहा वर्षांनी सुरू झालेल्या या मालिकेला टीआरपीच मिळेनासा झाला आहे. टीआरपीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकांमध्येही ही मालिका नाहीये.
एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे “दंगल’ आणि “ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटांमधून झळकलेल्या अभिनेत्री फातिमा सना शेखला ही मालिका कमालीची आवडते म्हणे ! इतकेच नव्हे तर तिच्या स्वप्नांमध्येही याच मालिकेशी संबंधित विषय असतात.
फातिमाने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यामध्ये ती म्हणते की “कसोटी…’ या मालिकेतील अनुराग आणि प्रेरणाच्या प्रेमकहाणीशी संबंधित मी एक भयानक स्वप्न पाहिले. त्यामध्ये अनुराग प्रेरणाचा खून करतो.
आता प्रश्न असा आहे की, फातिमा अशा प्रकारच्या स्वप्नाचा जाहीरपणाने उल्लेख करून या मालिकेचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न तर करत नाहीय ना? की या मालिकेत लवकरच आश्चर्याचा धक्का देणारा नवा ट्विस्ट येणार आहे? लवकरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील…