मुंबई – फातिमा सना शेख नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकांउटवरफोटो शेअर करत असते. ती नेहमीच आपल्या लाईफचे अपडेट आपल्या फॅन्सशी शेअर करत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने धक्कादायक गौप्यस्फोट केलं आहे.
फातिमा सांगितले की,’मलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. आयुष्यात अशीही एक वेळ आली होती, जेव्हा असे सांगण्यात आले की, जर शरीरसंबध ठेवले तरच तेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होत असतो.’
ती पुढे म्हणाली, केवळ 3 वर्षांची असताना माझा विनयभंग झाला होता. अशा घटना स्त्रियांच्या आयुष्यात कलंकासारख्या असतात. त्या कधीच या घटनांबद्दल बोलत नाहीत. पण आता जमाना बदलला आहे.