crime news – महाराष्ट्रातील नवगढ परिसरात आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलीच्या पित्याला अटक केली आहे.
नवगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मुलीला धमकावत तिच्यावर बलात्कार करत होता. पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिचा गैरफायदा घेत असे.
पीडित तरुणीने त्याला विरोध केला तर तो तिला बेदम मारहाण करायचा. तिने ही घटना तिच्या मोठ्या बहिणीला सांगितली, त्यानंतर तिने पीडितेला जवळच्या पोलिस ठाण्यात नेले आणि गुन्हा दाखल केला,असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाशी संबंधित अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यांतर त्या भागातील अनेक नागरीकांनी तीव्र संताप व्यकत केला आहे.