वरवंड -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोल नाक्यावरून स्थानिक वाहने मोफत सोडण्यात यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीसाठी दौंड तालुक्यातील वाहनांना शनिवारपर्यंत (दि. 25) पाटस टोलनाक्यावर टोल माफी झाली नाही तर रविवारपासून (दि. 26) या नाक्यावर नागरिक जाहीर उपोषण करणार आहेत.
याबाबत जिल्हा अधिकारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यलय, पुणे पोलीस अधीक्षक, दौंड तहसीलदार कार्यालय, तसेच यवत पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील सर्व वाहनधारक नागरिकांना टोल फी माफ न केल्यास व जबरदस्तीने त्यांच्याकडून टोल फी वसुली सुरु ठेवल्यास रविारी (दि. 26) पाटस टोल प्लाझा येथे उपोषण करण्यात येणार असून यावेळी वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास देण्यात आले आहे.