खालापूर, (वार्ताहर) – केन कॉस्माटीक प्रा.लि.कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील नोकर भरती जाणीवपूर्वक करीत असल्याचे आरोप करत स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी शिव स्वराज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारपासून (दि. १४) सुरू करण्यात आले असून त्यात ग्रामपंचायतीचे उपसरपंचसह सहा सदस्यांनी सहभाग घेतला आहे.
खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हाद्दीत केन कॉस्माटीक प्रा.लि.कंपनी सुरू होत आहे. त्यात होराळे गावातील आणि परिसरातील महिला, तरूण, स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील नोकर भरती केली जात आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी शिव स्वराज्य संघर्ष समितीची स्थापना करून कंपनी प्रशासनाला आपल्या मागणीचे पत्र दिले.
परंतु, कंपनी प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ललीता जाधव, सदस्या रुपाली मोरे, सदस्या सुरेखा दळवी, रंजना वाघमारे, सदस्य गणेश मोरे, अंकुश मोरे, नागेश पाटील, शिवसेना विभाग प्रमुख (ठाकरे गट) कल्पेश पाटील उपोषणाला बसले आहेत.
तर, उपोषणाला पांठिबा देण्यासाठी मानाजी मोरे, मिलिंद मोरे, प्रभाकर जाधव, सुधाकर पाटील, शरद मुंडे, हर्षद दळवी, भगवान मोरे, जनार्दन पाटील, ठाकरे गट शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका अनिता पाटील उपस्थित होते, अशी माहिती शिवसेना विभाग प्रमुख (ठाकरे गट) कल्पेश पाटील यांनी दिली.