अवकाळीचा नाना कळा : शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत
मांडवगण फराटा- शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे दि. 25 मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तीन शेतकऱ्यांच्या शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वारा सुटला. यामध्ये बापूराव सदाशिव गरुड (15 गुंठे), लालासाहेब काशिनाथ जगताप (10गुंठे) यांचे नुकसान झाले आहे.
महेश मुरलीधर जगताप (10 गुंठे) यांचे वादळी वाऱ्यामुळे शेडनेट हाऊसमधील रिजवान जातीची निर्यातक्षम मिरचीचे पूर्ण नुकसान झाले आहे. यावेळी झालेल्या नुकसान क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी मंडलधिकारी प्रसन्ना केदारी, तलाठी कोळगे दादा, गणेश परभाणे, नामदेव खोरे, मानसिंग शितोळे, मोरे, प्रशांत जगताप, निलेश कोंडे, अमित भोसले, पांडुरंग शिंदे, अमोल गरुड, पप्पू गरुड, संदीप गरुड उपस्थित होते.