कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज; जनतेने गांभिर्य ओळखुन वागावे 

ओतूर: ओतूर ग्रामपंचायत हद्दीत ११०० च्यावर बाहेरुन आलेले लोकांची नोंद घेण्यात आली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी यांनी सांगितले. सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस विषयी चर्चा असताना सगळ्या स्थरातून कोरोनावर मात करण्यासाठी निरनिराळे उपाय केले जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग,ग्रामपंचायत प्रशासन आणि समाजसेवी संस्था व व्यक्तिमत्व समाज जागृती करत आहेत तसेच प्रशासनाकडुन जनतेला घरी राहण्याचे आवाहन देखील केले जात आहे.

शासनाने कुठेही कामाशिवाय बाहेर विनाकारन न फिरता घरातच राहण्याचे सांगितले आहे. अशा कडक सुचना देऊन अत्यावश्यक व जिवनावश्यक गरजेकरिता घराबाहेर पडावे अशा सुचना देत पोलिसांची देखील जबाबदारी वाढली.यातच जामावबंदी,संचारबदी आणि जिल्ह्यात नाकाबंदी देखील केली करण्यात आली.

पुणे,मुंबई सारख्या शहरीभागातून तसेच परगावाहून गावामधे आलेले, पाहुणे व नविन आलेल्या लोकांची नोंद घेण्याच्या सुचणेनुसार ओतूर ग्रामपंचायतकडुन अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत नोंद घेऊन अकराशेच्या वर लोक गावात आल्याबाबतची माहीती गटविकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर आणि तहसिलदार जुन्नर यांना दिलीअसल्याचे ओतूरचे ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर हद्दीतील परदेशवारी करुन आलेल्या आठ जनांना कोरोंटाईन करण्यात आले आहे.या कुटुंबातील सदस्यांना संपर्क टाळण्याबाबत सुचना देण्यात आल्या असून प्रकृतीत काही जाणवल्यास तात्काळ संपर्क साधण्याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.यादवराव शेखरे यांनी सांगितले.तसेच या कोरोना विषयी बोलताना ते म्हणाले हा गंभीर विषय असल्याने लोकांनी काळजी घ्यायला हवी.विनाकारन घराबाहेर पडुच नये.कोरोनाबद्दल सांगितलेल्या सुचनांचे नागरिकांनी काटेकोर पालन करायलाच हवे.पाणी भरपुर प्यावे असा सल्ला देखील डॉ.यादवराव शेखरे यांनी दिला आहे.

जनतेने कोरोना व्हायरसविषयी अतिशय गांभिर्याने घ्यायला हवे.शासनाच्या सुचनांचे पालन न झाल्यास कारवाईला सामोरे जावेच लागणार असून विनाकारन घराबाहेर पडलेल्या,फिरस्त्यांवर कडक कारवाई पोलिस विभागाकडुन केली जाणार असल्याचे व जनतेने आपली स्वतःची व समाजाची काळजी घ्यावी असा सल्ला वजा सुचना ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी जनतेला दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.