सरकारच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या : पवार

काल बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांचं आगमन होताना एका शेतकऱ्याने जीव दिला. त्याने घातलेल्या भाजपाच्या शर्टवर पुन्हा आणुया आपले सरकार असे लिहिले होते. या सरकारला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे या धक्कादायक प्रकारातून पुन्हा प्रकर्षाने उघड झाले, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैजापूर येथे केली.

वैजापूर मतदार संघातील उमेदवार अभय चिकटगावकर यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवार बोलत होते. 1966 साली मी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असताना पक्षाकडे निवडणुकीचे तिकीट मागितले. माझ्यासोबत जणांनी तिकिटाची मागणी केली. पण माझे भाग्य होते आणि माझ्या पहिल्या निवडणुकीत पाठीशी वैजापूरच्या विनायक पाटील यांच्या नेतृत्वाचा हात होता, असे ते म्हणाले.

वैजापूर तालुका म्हटलं की दुष्काळी भाग डोळ्यांसमोर येतो. आजच्या सत्ताधाऱ्यांनी या भागासाठी ठोस पावले उचललेली नाहीत. मी राज्याच्या विधानसभेत जरी नसलो तरी राज्यातील प्रत्येक भागाची इत्थंभूत माहिती घेत असतो. पक्षाने विकासाच्या दृष्टीने अभय चिकटगांवकरांची उमेदवार म्हणून निवड केली आहे,असेही पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.