#Foodiesकट्टा: ‘चवीने खाणार… त्याला पुणेकर देणार’

“डिजिटल प्रभात’चा “फूडीज कट्टा’

“डिजिटल प्रभात’च्या “फूडीज कट्टा’मध्ये आपले सहर्ष स्वागत. “चवीने खाणार… त्याला पुणेकर देणार’ असं नेहमी म्हटलं जातं. अस्सल महाराष्ट्रीयन, गावाकडच्या डिशेसपासून साऊथ-नॉर्थ इंडियन आणि कॉन्टीनेंटल फूडपर्यंत सगळ्याच प्रकारच्या डिशेस कुठे, केव्हा मिळतात, हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला या फूडीज कट्टाची सफर करावीच लागेल.

स्पॅनिश, थाई, इटालियन फूड, बर्गर्स-पिझ्झाजसह मोगलपोडी इडली ते भिशिब्याळी अन्नापर्यंत आणि तंदूर चिकनपासून मराठवाडी-मालवणी मटणापर्यंत सर्व काही व्हरायटीचजा एक धावता आढावा तुम्हाला फूडीज कट्टा येथे जरुर मिळेल. तर मग भेट द्यायला विसरु नका “डिजिटल प्रभात’चा “फूडीज कट्टा’… खास खवय्यांसाठी… म्हणजेच फक्त तुमच्यासाठी!!!

पुण्यात बिर्याणी हा शब्द जरी उच्चारला, तरी पहिलं नाव ओठांवर येतं ते, खजिना विहिर चौकातल्या एसपीज बिर्याणीचं. विशेष म्हणजे, वर्ष 2019 मध्ये या एसपीज बिर्याणीनं आपल्या ग्राहकसेवेचा रौप्य महोत्सव साजरा केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×