फरहान अख्तर “तुफान’ची तयारी करतो आहे, हे काही आता लपून राहिलेले नाही. मात्र या सिनेमाच्या तयारी दरम्यान ट्रेनिंग सेशनमध्ये झालेल्या किरकोळ अपघातामुळे फरहान जखमी झाला आहे. या ट्रेनिंग सेशनमध्ये फरहानला हेवी वर्कआऊट करायला लागत होता.
त्याने एखाद्या कसलेल्या बॉक्सिंगपटूप्रमाणे बॉडी केली आहे. या वेळी बॉक्सिंगची प्रॅक्टीस करताना फरहानच्या हाताला “हेअरलाईन फ्रॅक्चर’ झाले आहे. फरहानने या फ्रॅक्चर झालेल्या हाताचा एक्स रे सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. आता या फ्रॅक्चरमुळे त्याला काही काळ बॉक्सिंगची प्रॅक्टीस बंद ठेवावी लागणार हे उघड आहे. त्याने अन्य मार्गांनी आपले शुटिंग सुरू ठेवले असेल, यात काही शंका नाही.
“तुफान’चे शेड्युल डिस्टर्ब होणार नाही, याची त्याने व्यवस्थित काळजी घेतलेली असेल. “तुफान’ पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्याशिवाय फरहान सध्या “द स्काय इज पिंक’चे प्रमोशन करतो आहे.
आता हा सिनेमाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा व्हायला लागली आहे. फरहानच्या प्रियांका चोप्राबरोबरच्या या पहिल्याच सिनेमाला परीक्षकांनी चांगली पसंती दिली आहे.