कृष्णा (आंध्र प्रदेश) – आंध्रा पोलिसांनी कासवची तस्करी करणा-या दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 700 कासव आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई कृष्णा जिल्ह्यातील कोरूकोल्लू या गावात करण्यात आली.
पी. नागाभूषणम् आणि एन. अंजनेयुलु अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना कैकलुरू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक टी. रामाकृष्ण यांनी सांगितले की, ओडिसा राज्यातून कासवांची तस्करी करण्यात येणार असल्याची पोलिसांना गुप्तहेरांकडून बातमी समजली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुमारे 700 कासव आढळून आले. ही कासवे त्यांनी ओडिसा राज्यातून आणली असल्याचे पोलिसांना सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून जप्त करण्यात आलेली कासवे वन विभागाच्या स्वाधिन करण्यात आली आहेत, अशी माहिती संबंधित अधिका-याने दिली.