मुंबई – प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर फराह खान तिच्या बॉसी स्टाइलसाठी ओळखली जाते. कामादरम्यानचे अनेक फोटो फराह आपल्या सोशल मीडियावरून वारंवार शेअर करत असते. नुकतंच फराह तिच्या मुलांसोबत छोट्या मुलांप्रमाणे वागल्याचे दिसून आले. फराहने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या मुलांसोबत किचनमधील प्लेट्स तोडताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये फराह आपल्या मुलांसोबत धडाधड प्लेट फोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर प्लेट फोडल्या म्हणून काहींनी संतापही व्यक्त केला आहे. अनेकांनी तर फराहला सल्ले देखील दिले आहेत. काहींनी पैसे वाया घालवू नका तर काहींनी त्या प्लेट गरिबाला देऊन टाका अशा कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
यावेळी फराह खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दिल से बेहतर है प्लेट तोडो…यासोबत तिने हॅशटॅगवर सांगितले की ही ग्रीक परंपरा आहे म्हणून प्लेट फोडल्या आहेत. व्हिडिओ क्लिपमध्ये फराह आणि तिची मुले मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये प्लेट्स तोडताना दिसत आहेत. फराहच्या या कृतीमुळे अनेकांनी तिच्या विरोधात नाराजीचा स्वर सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे.