मथुरा – हत्तीवर बसून योगासन करत असताना हत्तीने हालचाल केल्याने तोल जाऊन रामदेव बाबा हत्तीवरून खाली पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मथुरेतील महावन येथील रमणरेती आश्रमातील असून तो कालचा (सोमवार, 12 ऑक्टोंबर) असल्याचे सांगण्यात येत आहे.
Spine injuries are serious. Hope he recovers soon 🙏 https://t.co/qQtgl8YVB3
— Farah Khan (@FarahKhanAli) October 14, 2020
या व्हिडीओवर अभिनेत्री फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली. “पाठीच्या कण्याला होणारी दुखापत फार गंभीर असते. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रामदेवबाबांसाठी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, रामदेव बाबा रमणरेती आश्रमातील संतांना योगाभ्यास शिकवत होते. यावेळी ते हत्तीवर बसून योगा करत होते. हत्तीने हालचाल केल्याने बाबांचा तोल गेला आणि ते जमीनीवर पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ 22 सेकंदाचा असून यात रामदेव बाबा योगा करताना आणि हत्तीने हालचाल केल्यानंतर खाली पडल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.