मुंबई – आपल्याकडे आजही सिनेमांमध्ये किंवा चित्रपटामध्ये एखादे आध्यत्मिक पात्र साकारणाऱ्या कलाकाराला प्रेक्षक तशाच भूमिकांमध्ये पाहणं पसंद करतात. मग त्या कलाकाराने त्या भूमिकेला न्याय देऊनही दुसरी एखादी भूमिका केलेला प्रेक्षकांच्या पचनी तितक्या लवकर पडताना दिसत नाही. तसाच काहीसा प्रकार दीपिका चिखलिया या अभिनेत्रीसोबत होताना पाहायला मिळतोय. दीपिकाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे चाहते तिच्यावर चांगलेच नाराज झाल्याचे दिसून येतात.
View this post on Instagram
दीपिकाने रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये सीतामातेची भूमिका साकारली होती. यामुळे आजही त्यांच्याबाबतची एक वेगळी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात आहे. आजही प्रेक्षक दीपिका यांना सीता मातेच्या भूमिकेतच पाहन पसंद करतात. म्हणूनच दीपिका चिखलिया यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या एका डान्स व्हिडिओला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांना त्यांना नको ते सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. उतार वयात आपली प्रतिमा का बदलण्याचा प्रयत्न करत आहात ? असा सवाल एका युजरने विचारला आहे. तर दुसऱ्याने अरुण गोविल यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला त्यांना यावेळी दिला आहे.