मुंबई – सध्या आदिपुरुष चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकतच आदिपुरुष चित्रपटासाठी तिरुपती येथे एक इव्हेंट पार पडला. ज्या कार्यक्रमासाठी अभिनेता प्रभास अभिनेत्री क्रिती सिनॉनसह सर्व टीम मेंबर्स उपस्थित होते. यादरम्यानच एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक ओम राऊत क्रिती सिनॉनला किस करताना दिसत आहे. या फोटोमुळे दिग्दर्शक ओम राऊत चांगलेच चर्चेत आले आहेत.
तिरुपती मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर क्रिती मंदिर परिसरातून जात असताना ओम राऊत यांनी तिला आलिंगन दिल. यावेळी राऊत यांनी क्रितीच्या गालवर गुडबाय किस देखील केलं. मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बॉलिवूड स्लेलीब्रेटींसाठी हा प्रकार रोजच्या जीवनातील सवय असली तरी नेटकऱ्यांना हा प्रकार चांगलचं खटकला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर यासंबंधी सवाल उपस्थित करायला सुरुवात केली असून, आता यावर ‘रामायण’ मालिकेतील ‘सीता’ म्हणजे अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Chief Priest @csranga of Chilkur Balaji Temple, #Hyderabad, took strong objections over greetings between Bollywood actress @kritisanon and the director of upcoming movie #Adipurush#KritiSanon & #OmRaut greeted each other at #Tirumala temple premises that has raised objections. pic.twitter.com/BsmVkoEXye
— Surya Reddy (@jsuryareddy) June 7, 2023
एका मुलाखती दरम्यान बोलताना दीपिका चिखलिया म्हणल्या की, “आज कलाकार भूमिका अनुभवत नाहीत… भूमिकेच्या भावना आजचे कलाकार समजू शकत नाहीत. मला असं वाटतं त्यांच्यासाठी रामायण फक्त एक सिनेमा असेल… क्रिती आजची अभिनेत्री आहे. तिने कदाचित स्वतःला भूमिकेत कधीच अनुभवलं नसेल.
आताच्या पिढीमध्ये मिठी मारणं.. किस करणं सामान्य असेल.. पण क्रितीने कधी स्वतःला सीता मानलं नाही… मी स्वतः सीताची भूमिका फक्त साकारली नाही तर, जगली आहे. आजचे कलाकार फक्त भूमिका साकारतात आणि सिनेमा संपल्यानंतर त्यांना कोणताच फरक पडत नाही.’ असं दीपिका चिखलिया यावेळी म्हणाल्या.