सेलिब्रिटी होण्याचे फायदे तर आहेतच, मात्र तोटेदेखील आहे. अनेक गोष्टींमुळे सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल केले जाते. आता ट्रोलर्सच्या जाळ्यात अभिनेत्री काजोल अडकली आहे. तसं बघायला गेलं तर काजोल सोशल मीडियावर फार काही सक्रिय नसते. पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
View this post on Instagram
काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये काजोल हवेत सफरचंद कापताना दिसत आहे. सर्व प्रथम काजोल हवेत सफरचंद फेकते, त्यानंतर ती हवेतचं ते फळ कापताना दिसत आहे. काजोलचं हे कृत्य तिच्या चाहत्यांना मात्र पटलेलं नाही. व्हीडिओमुळे काजोल ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकली आहे.
View this post on Instagram
ट्रोलर्स म्हणाले, ‘असं अन्न वाया घालवू नको, लोक अन्नासाठी मरत आहेत. ‘ सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोना महामारीमुळे सर्वांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत काजोलने हा व्हीडिओ पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.