दंगल गर्ल म्हणजेच फातिमा सना शेख अनेकदा सोशल मीडियावरील आपल्या फोटोज आणि व्हिडिओजमुळे चर्चेत असते. तसेच ती आपल्या पर्सनल लाईफशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करत असते. फातिमाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती कशा प्रकारे एका व्यक्तीच्या शोषणाची शिकार झाली होती.
View this post on Instagram
एका एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना फातिमाने या अपघाताचा खुलासा केला. तिने सांगितले की एका व्यक्तीने तिला स्पर्श करण्यासाठी गुद्दा मारला होता. फातिमाने सांगितले की ती जिममधून घरी परतत होती. त्यावेळेस एक व्यक्ती बऱ्याच वेळेपासून तिच्याकडे सतत बघत होती.
View this post on Instagram
फातिमाच्या मते, मी त्याचा सामना केला आणि विचारले की असा का बघत आहेस. तेव्हा लाज न बाळगता तो म्हणाला ही माझी इच्छा आहे. मी त्याला म्हटले तुला कानाखाली खायची इच्छा आहे का यावर त्याने उत्तर दिले की हो मला कानाखाली मार.
View this post on Instagram
फातिमा सना शेखने सांगितले की, जेव्हा मी त्याला कानाखाली मारली तेव्हा त्याने मला जोरदार गुद्दा मारला. मी तिथेच बेशुद्ध झाले. यानंतर लगेचच मी याची माहिती माझ्या वडिलांना फोनद्वारे दिली. ते तातडीने आपल्या मित्रांसोबत तेथे पोहोचले. माझे वडील आणि त्यांच्या मित्रांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांना विचारले की कोणी माझ्या मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. फातिमा म्हणाली, माझे वडील खूप स्ट्रॉंग आहेत तेच माझी सगळ्यात मोठी ताकद आहेत.