“जन्नत-2′ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या बोल्ड फोटोंमुळे सतत चर्चेत असते. ईशाला अनेक वेळा तिच्या हॉट फोटोंमुळे ट्रोलही करण्यात आले होते. परंतु ईशावर याचा काहीही परिणाम झाला नाही. आजही तिच्या या लुकवर लाखो चाहते फिदा असल्याचे दिसून येते.
View this post on Instagram
“I am not afraid of storms for I am learning how to sail my ship”- Louisa May Alcott
ईशा गुप्ताने नुकतेच तिचे काही थ्रोबॅक बिकिनी फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिचा हॉट अंदाज पाहण्यासारखाच आहे. यापूर्वीही ईशाने आपल्या बिकिनीतील फोटोतून चाहत्यांची मने जिंकलेली आहेत.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या फोटोत ईशा व्हाइट कलरच्या मोनोकिनी बिकिनीत खूपच सुंदर पोज देताना दिसते. परंतु हे तिचे जुने फोटोशूट केलेले काही फोटो आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ईशा गुप्ता अखेरच्या वेळी अनुपम खेरसोबत “वन डे ः जस्टिस डिलिवर्ड’ चित्रपटात झळकली होती. आता ती लवकरच अमिषा पटेलच्या “देसी मॅजिक’मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती झी-5च्या चर्चित “रिजेक्ट्स’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीजनमधून डिजिटल डेब्यू करणार आहे.