बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे नुकतेच एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे वामिका असे नामकरण केले आहे. सध्या दोघेजण आपल्या पॅरेंटहुडचा आनंद घेत आहेत. त्यातच त्यांचे चाहतेही त्यांच्या लाडकीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
विरुष्काची ही जोडी सतत लाइमलाइटमध्ये असते. सध्या हे दोघेजण सोशल मीडियावर कपल गोल्स देताना दिसून येत आहे. दरम्यान, 2019मध्ये वोग मॅगझीनला दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्का म्हणाली होती की, ती विराटचे कपडे वापरत असते.
दरम्यान, अनुष्काने आपल्या मुलीचा एक फोटो शेअर केला होता. परंतु या फोटोत तिचा चेहरा दिसत नव्हता. अनुष्का शर्माने आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करत लिहिले होते की, आम्ही एकसोबत प्रेम आणि कृतज्ञताने राहत होतो, परंतु या छोटयाशा, वामिकाने हा आनंद एका नवीन स्तरावर पोहोचविला आहे. अश्रू, हास्य, चिंता, आनंद असे सर्व हावभाव आम्ही एका क्षणात अनुभवले आहे. आपण सर्वांनी दिलेले प्रेम आणि आशिर्वादाबद्दल पुन्हा एकदा आभार.