असा आहे, हॉट अँड ग्लॅमर्स जान्हवी कपूरचा फिटनेस प्लॅन

अभिनेत्री 'जान्हवी कपूर' चित्रपटात येण्यापूर्वी आपल्या फिटनेसकडे फारसे लक्ष देत न्हवती.

मुंबई – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस दाखवले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. २०१८ मध्ये सैराट चित्रपटाच्या हिंदी रिमेकने बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ चित्रपटात येण्यापूर्वी आपल्या फिटनेसकडे फारसे लक्ष देत न्हवती. परंतु हल्ली जान्हवी फिट राहण्यासाठी डायट प्लॅनसुद्धा फॉलो करत आहे.

 

View this post on Instagram

 

⚪️⚫️

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

दरम्यान, आता जान्हवी कपूर सिक्स पॅकसाठी 5 मिनिटातला जलद व्यायाम करते. तसेच काॅर्डिओ आणि वेटलिफ्टिंग करते. तिला खायची आवडत असली, तरी ती आपल्या आहाराची तितकीच काळजी घेते.

 

View this post on Instagram

 

? day 2

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी जास्तकरून हिरव्या भाज्या आणि फ्रेश फळं खाते. सकाळी उठल्यावर ग्लासभर पाणी पिते. ती कधीही झोपण्याआधी 3 तास आधी डिनर करते. डिनरला ती भाज्यांचं सूप, उकडलेल्या भाज्या आणि ग्रिल्ड फिश पसंत करते.

 

View this post on Instagram

 

Still fighting jet lag tbh….✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

दरम्यान, जान्हवी यंदाच्या वर्षी जोया अख्तरच्या हॉरर शॉर्ट फिल्म ‘घोस्ट स्टोरीज’ आणि हॉरर-कॉमेडी ‘रुईफ्झा’ यासह अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.