मुंबई – अभिनेत्री मालविका मोहनन हिने बियॉन्ड द क्लाउड्स या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपट पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मालविका आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते.
बियॉन्ड द क्लाउड्स या सिनेमात अभिनेता इशान खट्टरबरोबर ती मूख्य भूमिकेत होती. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता.मालविका मलयाळम सिनेमांमध्ये देखील झळकली आहे. मालविका फिल्मी फमिली बॅकग्राउंडची आहे. तिचे वडील सिनेमॅटोग्राफर असून त्यांनी फुकरे, तलाश, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियाच्या माध्यमातून मालविका नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या मालविकानं आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
नुकतंचमालविका मोहनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच मालविका च्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.