पणजी – नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी या वाहिन्यांसाठी वन्य जीवांचे छायाचित्रण करणारे प्रसिद्ध सिने छायाचित्रकार सुबैय्या नल्लामुथु यांनी यंदा इफ्फीला सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्ताने त्यांनी डिजिटल प्रभात साठी दिलेला बाईट तुम्ही या व्हिडिओ तून पाहू शकता. यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, माहिती व प्रसारण मंत्रालय इथे त्यांनी काम केले आहे. त्यानंतर ते स्वतःच्या फिल्म्स बनवितात. मछली या वाघिणीवर त्यांनी बनवलेली फिल्म सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे.