मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री ‘जयंती’ यांचं (दि. 26) निधन झालं आहे. जयंती ह्या 76 वर्षांच्या होत्या. एक अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्री म्हणून जयंती यांना ओळखलं जात होत. बंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंती यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीला मोठा झटका बसला असून, अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे जयंती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जयंती यांनी आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम होतं. 1960 ते 80 ही तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती. त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.