बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आज दुपारनंतर राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्वत: जाहीर केले आहे. त्यांच्या सरकारने दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुपारच्या जेवणा नंतर ते राज्यपालांना भेटणार असल्याचेही त्यांनी माहिती देताना सांगितले आहे.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा म्हणाले की, मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारच्या जेवणाच्या नंतर मी राज्यपालांना भेटणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. आपण राजीनामा देणार नसल्याचं येडियुरप्पांनी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.