मुंबई – सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्याचा भर बाजारातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा अभिनेता चक्क लसूण विकताना दिसत आहे. हा अभिनेता दूसरा तिसरा कोणी नसून सुनील ग्रोवर आहे. कपिल शर्मा शोमधून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. परंतु काही महिन्यांपूर्वी त्याने हा शो सोडला. हा शो सोडल्यापासून त्याचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना बघायला मिळत आहे. आता तर तो चक्क रस्त्यावर लसूण विकताना दिसल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सुनीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्वतः सुनीलने सोशल मीडियावर पोस्ट केला असून यामध्ये तो बाजारात लसूण विकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका स्टूलवर बसलेला दिसत असून त्याच्यासमोर लसणाचा ढीग आहे. त्यामधून तो आलेल्या ग्राहकांना वजन करून लसूण विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “हमारी अटरियां” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी त्याच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. तर एका नेटकरऱ्याने ‘कपिल शर्मा जॉईन कर सगळं ठीक होईल’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. दरम्यान, याआधी देखील सुनीलचे कधी कांदा तर कधी दूध विकत असल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.