मुंबई: अजित पवारांनी उपमुख्यंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना टाळले. मात्र आज अजित पवारांनी आज सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.
मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यासाठी सर्वा अजित पवार विधानभवनात दाखल झाले आहेत. तसेच मला सध्या काही बोलायचे नाही, मी योग्य वेळ आल्यावर बोलणार, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच काल उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री उशिरा अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
दरम्यान, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील अजित पवार यांची मनधरणी केली होती. अखेर पवार कुटुंबियांची भावनिक साद अजित पवारांनी ऐकत एक पाऊल मागे घेतले. आज विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.