टपाल विभागाच्या वेबसाईटमध्ये बिघाड!

नगर  – दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांनासाठी गेल्या काही दिवसापासून भरतीत डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 540 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये ब्रॅंच पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर, डाक सेवक अशा तीन पदासाठी जागा आहेत. पण, वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. साहजिकच अर्ज भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

एवढी मोठी भरती निघाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शहरी भागातील विद्यार्थी देखील अर्ज भरू इच्छित आहेत. शहरातील अनेक सायबर कॅफेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून यात डाक विभागाचे अर्ज भरण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बेरोजगारी असल्यामुळे सर्वांचाच कल या मेगा भरतीकडे आहे. देशात आर्थिक मंदीचे सावट असताना तसेच ऑटो सेक्‍टरसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना नोकऱ्या गमावण्याची वेळ आलेली असताना देशातील बेरोजगार तरुणांसाठी डाक सेवक भरती एक सुवर्णसंधी होती. मात्र, 3 हजार 650 जागांसाठी वेबसाईट चालत नसल्याने अनेकांची तारांबळ होत आहे.

यात विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण, हा सवाल विद्यार्थी वर्गातून समोर येत आहे. एवढी मोठी भरती शासनाने काढली मात्र, त्याचा लाभ वेबसाईटच्या बिघाडामुळे विद्यार्थ्यांना घेता येत नाही, मग ही भरती कशासाठी काढण्यात आली असाही अनुत्तरित प्रश्‍न समोर येत आहे.

Ads

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here