Fadnvis On Jarange । मराठा आरक्षणसाठी उपोषण करत असताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सलाईनमधून विष देण्याचा किंवा इतर मार्गांनी ठार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गंभीर आरोप जरांगे यांनी केले होते. एवढेच नाही तर फडणवीसांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे. परंतु, मी त्यांना घाबरणार नाही. मी फडणवीसांचा ब्राह्मणी कावा चालू देणार नाही.” अशी जातीवाचक विधान करून उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय रंग चढला असल्याचे म्हटलं जातंय. तर जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचताय असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये जरांगेंच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
राजकारणातले वरिष्ठ लोकही असं वागतात Fadnvis On Jarange ।
फडणवीसांनी जरांगेंच्या ‘ब्राम्हणी कावा’ आणि ‘सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न’ या आरोपांवर म्हणाले, त्यावर जरांगे पाटील स्वतःच बोलले आहेत. ते म्हणाले की, ‘मी खूप दिवस उपाशी होतो त्यामुळे माझा बोलताना ताबा सुटला.’ जरांगे पाटील यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिल्यामुळे त्याकडे लक्ष देत नाही, तुम्हीदेखील (प्रसारमाध्यमं) जरांगे-पाटलांचं वक्तव्य सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. मनोज जरांगे नवीन आहेत. परंतु, राजकारणातले वरिष्ठ लोकही असं वागतात.”असे म्हणून त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांसारखा माणूससुद्धा जातीवर येतो. आम्ही (भाजपाने) कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना निवडणुकीचं तिकीट दिलं तेव्हा शरद पवार किती नाराज झाले होते. तेव्हा शरद पवारांनी केलेलं वक्तव्य आठवून पाहा. शरद पवार तेव्हा म्हणाले होते की, पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमायला लागलेत. त्यामुळे जरांगे यांच्या वक्तव्याचं मला नवल वाटलं नाही. ते काही नवीन नाही.”
…तेव्हा जातीवरून आरोप लावण्याचे प्रयत्न Fadnvis On Jarange ।
“एखाद्या व्यक्तीविरोधात बोलायला काही नसेल तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. माझ्याविरुद्ध असा प्रकार होताना मी नेहमीच पाहिलं आहे. जेव्हा त्यांना माझ्याबद्दल बोलायला कुठलाही विषय मिळत नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचे किंवा राजकीय आरोप करता येत नाहीत, अकार्यक्षमतेचे आरोप करता येत नाहीत, तेव्हा जातीवरून आरोप लावण्याचे प्रयत्न केले जातात.