मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील द्वंद आता मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगल आहे. नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले. यावरून मलिक यांनी फडणवीसांना जाहीर आव्हान दिलं आहे.
फडणवीस माझं नाव खराब करण्याचं काम करत आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. त्याला काय म्हणावं, असा सवाल केला होता.
मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला असं तुम्ही म्हणाला होतात. याप्रकरणी माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटीस पाठवणार आहे. आरोप लावून तुम्ही माफी मागणार नसाल तर आम्ही आशा करतो की, या लढाईत तुम्ही माफी मागणार नाही, लढाई सुरुच ठेवू, असं मलिक यांनी म्हटलं.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, ही फाईल एनआयएकडे द्या किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जे आज मी बोलतोय, तो सगळा घटनाक्रम जसंच्या तसं घडला आहे. एनआयए असो किंवा सीबीआय चौकशी करो. त्यांना वाटेल नवाब मलिक घाबरणार. पण नवाब मलिक घाबरणार नाही, असंही ते म्हणाले.