नवी दिल्ली – सीबीआयने आयएनएक्स मिडीया प्रकरणात कॉंग्रेस नेते पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्या विरोधात ट्रायल कोर्टात खटला दाखल केला आहे. त्या कोर्टातील खटल्याच्या सुनावणीला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.
आता ही स्थगितीची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. हायकोर्टाने 18 मे रोजी ट्रायल कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. या खटल्याशी संबंधीत कागदपत्रे चिदंबरम यांनी तपासण्यासाठी मागितली होती.
ती कागदपत्रे त्यांना देण्याचा आदेश ट्रायल कोर्टाने दिला आहे. पण सीबीआयने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आरोपींना ही कागदपत्रे तपासासाठी दिली तर त्यांच्याकडून पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता आहे असे नमूद करीत सीबीआयने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.