काबुल – तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या रेडिओ स्टेशनच्या व्यवस्थापकाची हत्या केली असल्याचा संशय अफगाण सरकारने व्यक्त केला आहे. तालिबानने हेमंड प्रांतात एका पत्रकाराचे अपहरण केले आहे, असेही सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
अफगाण रेडिओचे व्यवस्थापक तुफान ओमर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ओमर हे पाकिता घाग रेडिओ स्टेशनचे व्यवस्थापक होते. ही हत्या तालिबानने केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दहशतवाद्यांनी आतापर्यंत किमान 30 पत्रकार आणि मीडिया कर्मचारी मारले गेले आहेत, असे एका स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र आपल्याकडे काबूलमधील हत्या किंवा हेमंडमधील अपहरण केलेल्या पत्रकाराबद्दल कोणतीही माहिती नाही, असे तालिबानने म्हटले आहे.