शिवजयंती निमित्त झील महाविद्यालयात विविध गड-किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा झील अभियांत्रिकी महाविद्यालयाने शिवजयंतीनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम सादर केला आहे.

महाविद्यालयाच्या, संगणक अभियांत्रिकी विभागाने गड-किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात शिवनेरी, रायगड, पन्हाळगड आणि विशाळगड या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत. या शिवाय किल्ले ‘रायरेश्वर’ पासून ते झील महाविद्यालयापर्यंत,विदयार्थी शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीनी मानवंदना वाहणार आहेत. हलगी वादन या सारख्या उपक्रमाचे आयोजन सुद्धा या विभागाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपला सोनेरी इतिहास माहीत व्हावा हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. नक्कीच हे प्रदर्शन सर्व शिवभक्तांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी पर्वणी ठरेल.

हे प्रदर्शन संगणक विभागाच्या ४० विद्यार्थ्यांनी , विभागप्रमुख डॉ. सुनिल सांगवे व प्रा. राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांमध्ये साकारले आहे.

– राज देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,
झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.