मुंबई – बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या अफेरच्या पूर्वी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. याशिवाय त्याच्या अनेक एक्स गर्लफ्रेंड असल्याचेही बोलते जाते. त्यात सोमी अलीच्या नावाचाही समावेश होता. मात्र, आता सोमी अलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सलमान खानवर गंभीर आरोप केले आहे. सलमानची कुंडली बाहेर काढणार असल्याचे तिने म्हटले आहे.
“भलेही आता एक सुपरस्टार असेल पण त्याच्या काही गोष्टी लोकांपर्यत पोहचायला हव्यात. असे मला वाटते म्हणून मी त्याची पोलखोल करणार आहे. त्याशिवाय शांत बसणार नाही”, असा गंभीर आरोप सोमीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये केला आहे. तिने कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु ती कोणाबद्दल बोलत आहे हे दिसून येत आहे. सोमीच्या पोस्टमधून केलेल्या गंभीर आरोपाने लक्ष वेधून घेतले आहे.
पुढे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी मानसिकदृष्ट्या खंबीर नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. माझ्या दारु पिण्याच्या सवयीवर बोललं जाईल. पण त्यातून तुम्ही जी गोष्ट खरी आहे ती बाहेर येण्यापासून थांबवू शकणार नाही. ज्यांनी माझे करिअर संपवले मी त्यांच्याविषयीही बोलणार असेही तिनं म्हटले आहे. आता माझी पोस्ट वाचल्यानंतर ती डिलिट करावी असे सांगण्यात येईल, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते. ऐश्वर्या आणि सलमानच्या अफेअरच्या चर्चा जास्तच रंगल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपुर्वी सोमीने ऐश्वर्यावरुन देखील एक पोस्ट शेयर केली होती. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आता सलमानबद्दल पोस्ट केली आहे. त्यामुळे सोमी नेमकी सलमानची काय पोलखोल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.