नगर, (प्रतिनिधी) – नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रावर लाइव्ही चित्रीकरण (वेबकास्टिंग) करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रत्येक हालचालींवर ३६ चित्रीकरण पथकाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती निवडणुक विभागाच्या वतीने देण्यात आली असून दोन्ही मतदारसंघातात एकूण १ हजार ८६७ मतदना केंद्रावर वेबकास्टिंगची नजर राहणार आहे.
चेन्नई येथील आय नेट सिक्युअर लॅब या खासगी संस्थेबाबत वेबकास्टिंगचा करार करण्यात आला आहे. अहमदनगर, शिर्डी मतदारसंघात (दि.१८) एप्रिल रोजी अधिसूचना जारी होइल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची (दि. २५) एप्रिल असून अर्जाची छाननी (दि.२६) एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल २०२३ आहे. तर मतदानाची (दि.१३) मे रोजी होणार आहे. तर मतमोजणी ही (दि.४) जून आणि निवडणुक प्रक्रिया ६ जून रोजी पूर्ण होणार आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
अकोले- १५४, संगमनेर-१३९, शिर्डी-१३५, कोपरगाव-१३६, श्रीरामपूर-१५६, नेवासा-१३५, शेवगाव -१८३, राहुरी १५४, पारनेर-१८३, नगर-१४३, श्रीगोंदा-१७२, कर्जत- जामखेड- १७८ अशा मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.