इम्रान हाश्मीला अलीकडेच आपण “मुंबई सागा’मध्ये बघितले होते. इम्रान हाश्मी सध्या आपल्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत करतो आहे. त्याला मुंबईतल्या एका जिममध्ये व्यायाम करताना अलीकडेच बघितले गेले होते. मुंबई कल्याण बांद्रा भागातल्या या जिममध्ये इम्रान नियमित हजेरी लावत असतो.
View this post on Instagram
तिथे तो बॉडीबिल्डिंगचे सर्व व्यायाम करत असतो. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तो या जिममध्ये लॉकडाऊनच्या काळातही येत असल्याचे समजले आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी हे दोघे महिन्याभरापूर्वीच रिलीज झालेल्या “मुंबई सागा’ मध्ये दिसले होते. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने खूप कमाई केली होती.
View this post on Instagram
पण मध्येच लॉकडाऊन लागल्याने आता “मुंबई सागा’ डिजिटल प्लॅटफॉर्मवरही रिलीज झाला आहे. तेथेही या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. आता नवीन प्रोजेक्ट करेपर्यंत इम्रानकडे स्वतःच्या बॉडीबिल्डिंगकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ आहे.