कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट गेल्या आठवड्यात कायमस्वरूपी सस्पेंड केले गेले आहे. आता इन्स्टाग्रामवर देखील कंगनाची पोस्ट डिलीट केली गेली आहे. यामुळे कंगना चांगलीच वैतागली आहे. येथे देखील आपण टिकू शकणार नाही, असे तिला वाटायला लागले आहे.
इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये कंगनाने आपल्याला झालेल्या कोविड संसर्गाबाबत लिहिले होते. तिची पोस्ट डिलीट केली गेल्यानंतर तिने एक नोट लिहिली होती. करोनाचे विषाणू आपल्या शरीरात पार्टी करत असतील, असे समजले आहे. आता त्या विषाणूंना मी संपवून टाकेल असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यामुळेच तिची पोस्ट डिलीट केली केली असावी असे कंगनाने या नोटमध्ये म्हटले आहे.
कंगना नेहमी प्रत्येकाच्या चुका आपल्या पोस्टमध्ये मांडत असते. टीका करत असते. त्यामुळे तिच्या पोस्टना एक प्रकारचा कडवटपणा आला असेल. तो कडवटपणा दूर करण्यासाठी कठोर परीक्षण करावे, असा सल्ला अपूर्व असरानीने तिला दिला आहे. त्यावर आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याने काहीजणांना दिलासा मिळाला असेल अशी कुत्सित टीकाही तिने केली आहे.