श्रीनगर – जम्मू काश्मीरातील स्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करण्यासाठी युरोपिन राष्ट्रांचे एक शिष्टमंडळ येथे दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात एकूण 20 सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीनगरचा दौरा केल्यानंतर हे शिष्टमंडळ गुरूवारी जम्मू भागालाही भेट देणार आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून तो भाग केंद्रशासित करण्यात आला आहे, तसेच या राज्यांना देण्यात आलेला 370 कलमा अंतर्गतचा विषेश राज्याचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे.
त्यानंतर या राज्यातील अंतर्गत शांतता धोक्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या राज्यातील नागरीकांवरही मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर युरोपियन शिष्टमंडळाच्या या दौऱ्याला विशेष महत्व दिले जात आहे.