-->

न्यूरेकाच्या आयपीओला चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली – इमारतीमधील आरोग्यविषयक उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या युरेका या कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला म्हणजे आयपीओला गुंतवणूकदारानी चांगला प्रतिसाद दिला आहे.
बुधवारी अखेरच्या दिवशी उपलब्ध शेअरच्या 40 पटीने मागणी आली असल्याचे दिसून आले. आयपीओमधील शेअरची किंमत 396 ते 400 रुपये इतकी होती. संस्थागत गुंतवणूकदारांनी या आयपीओमधील उपलब्ध शेअरची आवश्‍यक एवढी खरेदी अगोदरच केली आहे.

रेलटेलचा आयपीओ उपलब्ध

दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील रेलटेल कॉर्पोरेशनचा आयपीओ 18 फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना उपलब्ध राहणार आहे. बऱ्याच ब्रोकरेज संस्थानी हा आयपीओ लाभदायक असल्याचा निर्वाळा दिला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 819 कोटी रुपये उभे करणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.