सावधान ! UPI युजर्ससाठी NPCI कडून अलर्ट जारी; ‘या’ वेळेत पेमेंट करू नका, अन्यथा..

नवी दिल्ली – सध्या सगळीकडेच यूपीआय (UPI) आणि डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जर तुम्हीही यूपीआय वरून पेमेंट करत असाल तर पुढील काही दिवस रात्रीच्या वेळी युपीआय द्वारे पेमेंट करण्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने एक अलर्ट जारी करून युजर्सना सांगितले आहे की, आज मध्यरात्रीपासून युपीआय पेमेंट करण्यास अडचणी येऊ शकतात. एनपीसीआय ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. एनपीसीआय ने म्हटले आहे की, पुढील काही दिवस रात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान युपीआय पेमेंट करू नये.

एनपीसीआयने ट्विट करून दिली माहिती –

एनपीसीआयने ट्विट करून म्हटले आहे की, पेमेंट एक्सपिरीयन्सला अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी सिस्टमला रात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अपग्रेड केले जात आहे. या कालावधीत तुम्हाला पेमेंट करण्यास समस्या येऊ शकतात.

मागील काही दिवसांत बॅंकिंग फ्राॅडच्या घटनामंध्ये प्रचंड वाढ झाली आहे. डिजिटल बॅंकिंग आणि ऑनलाइन ट्रांजेक्शन करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे बॅंक अकाउंट बाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या फसवणूकच्या घटना पाहता बॅंक, आरबीआय, एनपीसीआय आणि सरकरकडून या संदर्भात नागरिकांना वेळोवेळी सतर्क केले जाते. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तसेच फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, कोणत्याही व्यक्तिकडून मेसेजद्वारे कोणतीही बॅंक, सरकारी एजेंसी, किंवा इतर वित्तिय संस्था, आर्थिक माहिती मागवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची माहिती मागण्यासाठी काॅल किंवा मेसेज आला तर बॅंकेशी संपर्क साधावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.