कोईमतुर – भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने पंचायत कार्यालयात घुसुन तेथे पंतप्रधान मोदींचा फोटो लावला. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्याला आज पंचायत समितीच्या तक्रारीवरून घुसखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या जिल्ह्याच्या पुलुवामपट्टी गावात हा प्रकार घडला. भारतीय जनता पक्षाने या कार्यालयात पंतप्रधानांचे छायाचित्रही लावले पाहिजे अशी मागणी केली होती, पण प्रशासनाने ती मानली नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केला.
त्या कार्यालयात द्रमुक नेते करूणानिधींचा फोटो आहे, पण मोदींचा नाही त्यामुळे भाजपचे जिल्हा सचिव एम. भास्करन यांनी कार्यालयात घुसखोरी करून हा फोटा लावला. यावेळी तेथे भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले होते. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यासाठी आम्ही कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहोत असे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.