मुंबई – मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते शाब्दिक चकमक घडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कथितरित्या अपशब्द वापरल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. तर नाना पटोलेंनी ज्या व्यक्तीबद्दल ते बोलले, त्यालाच समोर आणलं. आता हा वाद आणखी पेटला असून त्याला नाना पटोले यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदी नावाचा गावगुंड आहे. भाजपचे नेते गावगुंडाची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करत आहेत, भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असून मी पंतप्रधान मोदींचा अवमान केला नाही, याचा नाना पटोले यांनी पुनरोच्चार केला.
लोकप्रतिनिधींशी मी गावगुंडावर चर्चा केली. मात्र भाजपकडून मोदींची तुलना गावगुंडाशी करण्यात आली.भाजप नेत्यांचं संतुलन बिघडले आहे. खुद्द गावगुंडाने स्पष्टीकरण दिलं, तरीही भाजप नेते आक्षेप घेतात. माझ्या वक्तव्यातील मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नव्हे. मी पंतप्रधानपदाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतो, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं.
एका प्रचारसभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं वक्तव्य केलं होतं. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून भाजपनेते आक्रमक झाले होते. मात्र पटोले यांनी आपल्या वक्तव्यातील गावगुंड मोदी यालाच समोर आणलं होतं.