लंडन – वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यो रुटने कौटुंबिक कारणाने या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
या दोन संघांतील कसोटी मालिकेतील पहिला सामना येत्या 8 जुलैपासून साउदम्पटन येथे रंगणार आहे. मोइन अली व जॉनी बेअरस्टो यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका प्रथमच होत आहे.
इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स ऍण्डरसन, जोफ्रा आर्चर, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न, जोस बटलर, झॅक क्रॉउली, जो डेन्ली, ओली पोप, डॉम सिबली, ख्रिस वोक्स, मार्क वुडस्.