#ENGvIND : स्वातंत्र्यदिनाची देशवासीयांना भेट – कोहली

लंडन – लॉर्डस कसोटीतील विजय हा संपूर्ण भारतवासीयांना आमच्याकडून स्वातंत्र्यदिनाची भेट आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या. कोणा एका खेळाडूच्या कामगिरीने मिळालेला हा विजय नसून हा एक सांघिक विजय आहे.

नॉटिंगहॅम कसोटीतही आम्हाला विजयाची संधी होती मात्र, संततधार पावसाने ही संधी हुकली. मात्र, लॉर्डसवर आम्ही बाजी मारण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद जास्त आहे. आमच्या फलंदाजीत काहीवेळा सातत्य दिसलेले नाही पण आता उर्वरित सामन्यात हे सातत्य निश्‍चितच दिसेल.

लॉर्डसवरील सामन्यात महंमद शमी व जसप्रीत बुमराहने महत्त्वपूर्ण धावा करत संघाला विजयाची संधी मिळवून दिली. त्यानंतर या दोघांसह महंमद सिराज व इशांत शर्मा यांनी अफलातून गोलंदाजी करत केवळ 50 षटकांत दोन सत्रात इंग्लंडचे सर्व गडी बाद केले. हा विजय या मालिकेला कलाटणी देणारा ठरणार आहे, असेही कोहली म्हणाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.