पुणे – वाघोली तालुका येथील शाळा, महाविद्यालये, सोसायटी, माजी सैनिक कल्याण संघटना तसेच विविध प्रतिष्ठान व संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ध्वजारोहण सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच संदीप सातव, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्यासह समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.वाघोलीतील दिव्यांग बांधवांनी केसनंद फाटा दिव्यांग व्यापारी संकुलन समोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला.
या कार्यक्रमास लोणीकंद पोलीस स्टेशनचे एपीआय राजगुरू हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन धर्मेंद्र सातव पाटील यांनी केले होते.