साऊदम्पटन – आर्सेनलने साऊदम्पटनचा 2-0 असा पराभव करत इंग्लिश प्रीमिअर लीगमधील आवश्यक असलेला विजय मिळविला व स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यात यश मिळवले.
या स्पर्धेत आजवर अपयशी ठरलेल्या एडी कॅटियाहने 20 व्या मिनिटालाच गोल केला व संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यावेळी साऊदम्पटन संघाने पहिला हाफ संपुष्टात येइपर्यंत गोल करण्याचे केलेले अनेक प्रयत्न आर्सेनलच्या खेळाडूंनी उधळून लावले.
दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर देखील साऊदम्पटनच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. मात्र, आर्सेनलचा अभेद बचाव त्यांना भेदता आला नाही. जो विलॉक याने 87 व्या मिनिटाला गोल नोंदवला व 2-0 अशी आघाडी वाढवली.
आर्सेनलला या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी साऊदम्पटन विरुद्धच्या सामन्यात विजय अत्यंत आवश्यक होता.