लंडन – न्यूझीलंडचा संघ जवळपास सहा वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील हा पहिला सामना लॉर्डसवर खेळला जाईल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला इंग्लंड संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
दुखापतीमुळे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने माघार घेतली आहे. हा कसोटी सामना जिंकल्यास इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध 50 वा कसोटी सामना जिंकणारा पहिलाच संघ ठरणार आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यामध्ये इंग्लंडने 48 तर न्यूझीलंडने केवळ 11 कसोटी सामने जिंकले आहेत. ही कसोटी मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार नाही, आयसीसीच्या यापूर्वीच जाहीर केलेल्या मालिकांमध्ये या मालिकेचा उल्लेख नाही.
मर्यादित संख्येने प्रेक्षकांना प्रवेश
या सामन्यासाठी 8 हजार प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये करोनाचा धोका नियंत्रणात आला असून त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.