माणसाचे कर्तृत्व जातीवरून ठरत नाही तर गुणवत्तेवरून ठरते. महाराष्ट्रात अनेक गुणवंतांनी स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या नेत्याच्या विचाराने प्रभावित होऊन माण-खटाव तालुक्यात काम करणारी मनसेची “धरम-वीर’ची जोडी म्हणजे मनसे जिल्हाप्रमुख धैर्यशील पाटील व खटाव तालुका उपाध्यक्ष सूरज लोहार. सूरज लोहार यांचा आज (दि. 10) वाढदिवस. त्यानिमित्त…
मनसेने दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला होता. खटाव-माण तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी लोकांना पिण्याचे पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे व संपर्क नेते बाळा नांदगावकर यांच्या आदेशानुसार सूरज लोहार यांनी सातारा जिल्ह्यात युवा नेते धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. या कामाची दखल घेऊन सूरज लोहार यांची खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहर मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर खऱ्या अर्थाने “सूरजकी गर्मी से जलते हुए परबत की छाया’ या पद्धतीने या सूरजला मनसेची व धैर्यशील पाटील यांची छाया मिळाली. वडूज शहरातील दोन महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रिया, एसटी सवलत पास, परीक्षा कालावधीतील सुविधा मिळण्यासाठी सूरज लोहार यांनी परिश्रम घेतले. या कामाची दखल घेऊन त्यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या खटाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याला तालुका पातळीवर संधी मिळाली.
वडूजसारख्या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाली होती. लोहार यांनी पाठपुरावा केल्याने शस्रक्रिया व इतर विभागांची दुरुस्ती झाली. गेल्या चार वर्षांपासून ते जिल्हाप्रमुख धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली खटाव तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी सर्व जातीजमातींच्या लोकांना सहकार्य केले.
करोना काळात मानवतेच्या भावनेतून कष्टकरी नागरिकांना मदत केली. त्यांच्या 28 व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन अनेकांनी शुभेच्छा दिल्या. समाजाच्या कामासाठी या सच्च्या मनसे सैनिकाला दीर्घायुष्य लाभा, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे व जिल्हाप्रमुख धैर्यशील पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या युवा नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन – नितीन राऊत, वडूज