पुणे जिल्हा ; अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स खऱ्या करोना योद्धा

आमदार अतुल बेनके ः सेविकांना दीपावली निमित्त फराळ वस्तूंचे वाटप
जुन्नर (वार्ताहर) –
करोनाच्या संदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे, स्वतःच्या कुटुंबाबरोबर इतरांच्या आरोग्यासाठी धडपड करणाऱ्या या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स खऱ्या करोना योद्धा आहेत. त्यांचा सन्मान ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे गौरवाद्‌गार आमदार अतुल बेनके यांनी काढले.

जुन्नर तालुक्‍यातील अंगणवाडी सेविका, आशावर्कर्स व मदतनीस यांना ेनके कुटुंबीयांच्या वतीने दिवाळी फराळ वस्तू वाटप जुन्नर येथील कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे करण्यात आले. यावेळी आमदार बेनके बोलत होते. आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वेतनवाढ व अन्य मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.

यंदा करोना विषाणूमुळे रक्षांधनासाठी आपली भेट जरी होऊ शकली नाही तरी या दिवाळीला हा तुमचा भाऊ तुमची आठवण ठेवत तुम्हांला भेटायला आलाय. नगरसेवक भाऊ कुंभार व भाऊ देवाडे यांनी विचार व्यक्त केले.

याप्रसंगी सभापती विशाल तांबे, नगरसेवक फिरोज पठाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष पापा खोत, महिला अध्यक्षा आरती ढोबळे, वाजीद इनामदार, तौसिफ शेख, प्रदीप पिंगट, भूषण ताथेड, अजिंक्‍य घोलप, चेतन भोईर, अकिफ इनामदार इत्यादी उपस्थित होते. सूत्र संचालन संतोष ढोबळे यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.