अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी सज्ज आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात शाहिद आणि क्रितीचा रोमान्स पाहण्यासारखा असणार आहे. प्रेक्षक ते पाहण्याआधीच सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनने त्याच्या ‘ इंटीमेट सीन्स’बाबत निर्मात्यांना मोठा धक्का दिला आहे.
रिपोर्ट्सनुसार, CBFC ने चित्रपटातील इंटीमेट सीन्सवर कात्री चालवली आहे. त्याने चित्रपटातील ही दृश्ये 25% कमी केली आहे. तसेच त्याच्या 9 सेकंदाचा इंटिमेट सीन सेन्सॉर करण्यात आला आहे. याआधी इंटिमेट सीन 36 सेकंदांचा होता, तो आता 27 सेकंदांवर आला आहे. इतकेच नाही तर CBFC ने निर्मात्यांना चित्रपटाच्या आत मोठ्या आणि वाचता येण्याजोग्या फॉन्टमध्ये हिंदीमध्ये धूम्रपानाविरुद्ध संदेश देण्यास सांगितले आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा त्यांच्या अशक्यप्राय प्रेमकथेवर आधारित आहे.
यामध्ये शाहिदचे पात्र सिफ्रा (क्रिती सेनॉन) या कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोबोटच्या प्रेमात पडते. सिफ्रा हा रोबोट आहे हे त्याला माहीत आहे, पण तरीही तो तिच्याशी लग्न करतो. पुढे त्याला त्याच्या आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी आला होता आणि त्याला पसंती मिळाली होती.
हा चित्रपट दिग्दर्शक अमित जोशी आणि आराधना शाह यांनी बनवला आहे. दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर हे त्याचे निर्माते आहेत. शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त यात धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया दिसणार आहेत. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.